शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 23 ऑगस्ट 2018 (17:00 IST)

कोहली पुन्हा एकदा कसोटी क्रमवारीत अव्वल

भारतीय टीमचा  कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा कसोटी क्रमवारीत नंबर वन झाला आहे. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत विराटच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला होता आणि त्याचा फायदा त्याला क्रमवारीमध्ये झाला आहे. विराटने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला मागे सारत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
 
ट्रेंट ब्रिज कसटीमध्ये विराटने पहिल्या डावात 97 आणि दुसऱ्या डावात 103 धावांची खेळी करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. या दणदणीत खेळीमुळे विराटच्या क्रमवारीत आणि रेटिंग पॉईंटमध्ये वाढ झाली आहे. विराटचे आता 937 रेटिंग पॉईंट झाले असून याबाबतीत त्याने आपलाच पूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.
 
विराट कोहलीच्या नावावर सध्या 937 रेटिंग पॉईंट असून सर्वकालिन टॉप 10 स्थानापासून तो फक्त एक पॉईंट दूर आहे. आतापर्यंत डॉन ब्रॅडमन यांनी 961 पॉईंट, स्टीव्ह स्मिथ 947 पॉईंट, लेन हटन 945 पॉईंट, जॅक हॉब्स आणि रिकी पॉन्टिंग 942 पॉईंट, पीटर मे 941 पॉईंट आणि गॅरी सोबर्स, क्लाईड वॉलकॉट, व्हीव्हीएन रिचर्डस व कुमार संघकारा 938 पॉईंट मिळवले आहेत.