1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 23 ऑगस्ट 2018 (16:41 IST)

आता लवकरच वन नेशन वन कार्ड येणार

National Common Mobility Card
केंद्र सरकार आता कॅशलेस व्यवहारांसाठी जीएसटीच्या धर्तीवर वन नेशन वन कार्ड आणण्याच्या तयारीत आहे. नॅशनल कॉमन मोबिलीटी प्रकारचे हे कार्ड असून ग्राहक सर्व ठिकाणी या कार्डचा वापर करता येणार आहे. या कार्डला सोपे आणि सुलभ नाव सुचवण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले असून विजेत्याला १० हजार रुपयांचे बक्षीस सरकारने जाहीर केले आहे. सदरच्या कार्डला नाव सुचवण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट आहे. सुचवलेले नाव ओरिजनल असावे, तसेच नावावर कुठल्याही प्रकारचा कॉपी राईट नसावा अशी अट सरकारने ठेवली आहे.