शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 23 ऑगस्ट 2018 (09:13 IST)

यापुढे विद्यापीठे, कॉलेजांमध्ये‘जंक फूड’विक्रीला बंदी

देशभरातील सर्व विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये आणि अन्य उच्च शिक्षण संस्थांच्या कॅम्पसमध्ये चमचमीत परंतु सत्वहीन अन्नपदार्थांच्या (जंक फूड) विक्रीस पूर्ण बंदी करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. 
 
आयोग म्हणतो की, विद्यापीठे आणि कॉलेजांमध्ये ‘जंक फूड’ला बंदी केल्याने आरोग्यदायी खाद्यपदार्थांचे नवे मापदंड प्रस्थापित होतील. याने विद्यार्थ्यांचे आयुष्य अधित आरोग्यसंपन्न होईल. ते अधिक चांगला अभ्यास करू शकतील व त्यांच्यातील अतिलठ्ठपणाचे प्रमाणही कमी होईल. जीवनशैलीशी निगडित व्याधींचे अतिलठ्ठपणाशी निकटचे नाते असल्याने विद्यार्थी अशा व्याधींपासूनही मुक्त राहू शकतील. खरं तर आयोगाने असे निर्देश विद्यापीठांना द्यावेत, असा आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने २० आॅक्टोबर २०१६ रोजीच दिला होता. त्यानुसार आोयगाने लगेच विद्यापीठांना पत्रही पाठविले होते. परंतु त्याची पारशी अंमलबजावणी न झाल्याचे दिसल्याने आता आयोगाने जुन्या पत्राचा संदर्भ देत तेच निर्देश नव्याने जारी केले आहेत.