शनिवार, 25 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 22 ऑगस्ट 2018 (15:39 IST)

श्रीनगरमध्ये तणाव, लष्कराच्या गाड्यावर तुफान दगडफेक

Tension in Srinagar
श्रीनगरमध्ये ईदच्या नमाजानंतर तेथील फुटिरतावाद्यांनी भारतीय जवानांवर तुफान दगडफेक केली. तसेच यावेळी फुटिरतावाद्यांनी पाकिस्तानचे आणि इसिसचे झेंडे फडकवत घोषणाबाजी देखील केली. यामुळे श्रीनगरमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या फुटिरतावाद्यांवर नियंत्रण मिळवण्याचे सुरक्षा दलाच्या जवानांचे प्रयत्न सुरू आहेत. फुटिरतावादी तेथील लोकांची माथी भडकवून भारतीय जवानांच्या विरोधात वातावरण तयार करत आहेत. ईदनंतर तिथे जमलेल्या नागरिकांनी लष्कराच्या गाड्यांवर तुफान दगडफेक केली. मात्र लष्कराचा वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत या अतीप्रचंड दगडफेकीतून मार्ग काढत लष्काराच्या जवानांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं. तसेच या जमावावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले.
 
दरम्यान, कुलगाममध्ये झाझरीपोरा भागातील ईदगाह परिसरात दहशतवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत एक पोलीस जवान शहीद झाला आहे.