सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

सायकलला 11 मोबाइल बांधून गल्लोगल्ली फिरतात काका

काही लोकांना एक फोन सांभाळणं कठीण होऊन बसतं पण तायवानचे 70 वर्षीय चेन सॅन-युआन हे त्याच्या सायकलला चक्क 11 मोबाइल बांधून घराबाहेर निघतात. हे असं का करतात याचं कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल. तर याचं उत्तर आहे गेम. या काकांना गेमची फार क्रेझ आहे. 2016 साली आलेल्या पोकेमॉन गो गेमची त्यांना फार क्रेझ आहे. या गेममुळे अनेक अपघाताच्याही घटना समोर आल्या होत्या. पण हे काका या गेमचा पॉझिटीव्ह वापर करतात. पोकेमॉन गो गेममध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पोकेमॉन पकडायचे असतात. जे आजूबाजूच्या वस्तूंच्या रुपात असतात. यामुळेच हे काका सायकलला स्मार्टफोन बांधून गल्लीबोळांमध्ये फिरत असतात. जेणेकरुन पोकेमॉन पकडले जावे. गमतीदार बाब ही आहे की, हा गेम खेळणं त्यांना त्यांच्या नातवाने शिकवलं. हा गेम खेळायला सुरुवात केल्यावर तुम्ही त्यात हरवून जाता. तुम्हाला कशाचीही आठवण राहत नाही. पण हे काका या गेमचे फायदे सांगतात. ते म्हणाले की, हा गेम खेळण्याचे अनेक फायदे आहेत. आता लाइफ आधीपेक्षा अधिक हेल्दी झालं आहे. हा गेम खेळल्याने अल्झायमर(विसरण्याची सवय) होण्याचा धोका कमी होतो. तिसरी गोष्ट म्हणजे हा गेम खेळताना माझे काही नवीन मित्रही झाले आहेत. तायवानच्या जनतेत हे काका चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना अंकल पोकेमॉन म्हणून हाक मारली जाते. हे काका आपला हा शौक पूर्ण करण्यासाठी खर्चही मोठा करतात. ते यावर महिन्याला जवळपास 95 हजार रुपये खर्च करतात. यात इंटरनेट, बॅटरी, मोबाइल आणि इतर खर्च आहे.