सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (17:29 IST)

व्हॉट्सअॅप चॅटचा झाला वाद, केली तरुणाची हत्या

राहुरी तालुक्यातील वळण मांजरी येथे व्हॉट्सअॅपवर चॅटच्या वादातून तरुणाची हत्या झाली आहे. मंगेश आण्णासाहेब खिलारी (२२ ) असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेत मंगेशच्या डोळ्यात मारेकऱ्यांनी मिरची पूड फेकली. यामुळे मंगेशला काहीच दिसत नव्हते. त्याचदरम्यान इतरांनी चाकू व गुप्तीने मंगेशच्या पोट, छाती, चेहरा व डोक्यावर तब्बल २२ वार केले. यात मंगेशचा जागीच मृत्यू झाला.
 
या प्रकरणात गावातील मुलांचा व्हॉट्सअॅप ग्रुप होता. मंगेशही त्या ग्रुपमध्ये अॅड होता. काही दिवसांपूर्वी चॅटींगदरम्यान मंगेश व इतर मुलांमध्ये वाद झाला. त्यानंतर मंगेशने ग्रुपमध्ये बोलणे सोडून दिले. यामुळे इतरांनी त्यांच्यात मध्यस्थी करत वाद मिटवण्यास सांगितले. यामुळे मंगेशही झाले गेले विसरून पु्न्हा ग्रुपमध्ये बोलू लागला. रविवारी मंगेश हरिकीर्तनला जातो सांगून घराबाहेर पडला. पण परतलाच नाही. यामुळे घरातल्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली. अखेर घरातल्यांनी पोलीस स्टेशनमध्ये मंगेश बेपत्ता असल्याची तक्रार केली. त्यानंतर मांजरी रस्त्यावरील शेताजवळ मंगेशचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यानंतर तपासात मंगेशचा चारजणांशी वाद झाल्याचे पोलिसांना कळाले. नंतर सोमवारी पहाटे वळण येथून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच याप्रकरणातील दोघेजण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.