शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (09:16 IST)

केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीला वेग

केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ७२ हेलिकॉप्टर, २४ विमाने, ५४८ मोटरबोटी तसेच नौदल, लष्कर, हवाई दल, तटरक्षकदल तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलचे हजारो जवान सहभागी झाले आहेत. इस्रोच्या पाच उपग्रहांचाही मदत घेतली जात आहे.
 
पूरग्रस्त भागात अडकलेल्यांची सुखरुप सुटका करणे, त्यांना अन्नधान्याची पाकिटे पोहोचविणे असे विविधांगी मदतकार्य वेगाने सुरु आहे. राज्य सरकारने केलेल्या मागणीनूसार मदतकार्यासाठी केंद्राने तातडीने ६९०० लाइफजॅकेट, १६७ इनफ्लॅटेबल टॉवर लाइट, २१०० रेनकोट, १३०० गमबूट, १५३ चेन सॉ आदी सामुग्री पुरविली आहे. प्रवासी विमान सेवेसाठी कोचीचे नौदलाच्या हवाई तळाचा वापर करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. पुराचे पाणी धावपट्टीवर शिरल्याने कोची विमानतळ सध्या बंदच आहे.
 
ओशनसॅट-२, रिसोर्ससॅट-२, कार्टोसॅट-२, कार्टोसॅट-२ए, इन्सॅट ३डीआर या पाच उपग्रहांचाही मदतकार्यात सिंहाचा वाटा आहे. पूरस्थितीवर हे उपग्रह लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीमुळे मदतकार्य वेगाने पार पाडणे शक्य होत आहे.