बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018 (17:24 IST)

पुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याचा पुढाकार

केरळमध्ये आलेल्या पुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याही पुढे आल्या आहेत. पुढील सात दिवस केरळमध्ये दुरध्वनी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी या फोन कॉल आणि मोबाईल डाटा वापर विनामुल्य करण्याचं ठरवण्यात आल्याची माहिती वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली आहे. रिलायन्स जिओ आणि बीएसएनएलकडूनही मोफत टेलिफोन सेवा पुरवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय वोडाफोन, भारती एअरटेल, आयडिया सेल्युलर यांच्यातर्फेही पुढचे सात दिवस दुरध्वनी सेवांमध्ये काही महत्त्वाच्या सवलती देण्यात आल्या आहेत.
 
या दुर्दैवी प्रसंगात आम्ही ग्राहकांच्या सोबत आहोत. तुमच्या आप्तजनांच्या संपर्कात राहण्यासाठी आम्ही पुढील सात दिवस मोबाईल डाटा आणि दुरध्वनी सेवांमध्ये काही महत्त्वाच्या सवलती देत आहोत’, असा संदेश जिओतर्फे त्यांच्या केरळमधील ग्राहकांना पाठवण्यात येत आहे.