माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याची बातमी आहे. किडनीच्या आजारानं त्रस्त असलेल्या 93 वर्षांच्या वाजपेयी यांना 11 जूनला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
भारतीय राजकारणातील 'भीष्म पितामह' अटलजींची तब्येत मागील 24 तासात अधिकच खालावली होती. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. ते मागील नऊ वर्षांपासून आजारी होते. अटलीजींचा आठवणीतला शेवटला फोटो 2015 मध्ये समोर आला होता जेव्हा त्यांनी राष्ट्राध्यक्ष प्रणब मुखर्जी यांना भारत रत्न दिले होते. अटलजी सर्वमान्य नेते होते.
किडनीच्या आजारानं त्रस्त असलेल्या 93 वर्षांच्या वाजपेयींची प्रकृती गंभीर असून मागील काही दिवसांपासून खालवलेली होती. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्समध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. मोदी यांनी वाजपेयी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, भाजपाध्यक्ष अमित शाह हे देखील एम्समध्ये पोहोचले होते. तसेच अनेक नेते एम्समध्ये पोहचले होते.