सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

स्वांतत्रदिनानिमित्त मोदींनी देशाला केले संबोधित

७२ व्या स्वांतत्रदिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असून दिल्लीतील लाल किल्ला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर मोदींनी देशाला संबोधित केले. देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी देशाच्या विकासाचा संकल्प पुन्हा घेतला असून अनेक घोषणा केल्या.
 
प्रत्येक भारतीयांकडे घर, वीज,गॅस, पाणी, शौचालय, स्वस्त आरोग्य सुविधा, सुरक्षा, इंटरनेट मिळण्याचे संकल्प त्यांनी पुन्हा घेतले. त्यांनी या दरम्यान 4 वर्ष सरकारने मिळवले यशाचे बखान केले.
 
भाषण संपल्यावर त्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाइलप्रमाणे लहान मुलांची भेट घेतली. त्यांना भेटण्यासाठी मुलं उत्साहित होते आणि जसेच मोदी त्यांच्यात पोहचले ते भावनिक होऊन गेले.
 
भाषणाचे मुख्य बिंदू:
 
2022 हून पूर्व अंतरीक्षात मानव मिशन पाठवणार. भारताचे मुलं-मुली आता अंतरीक्षात जातील.
मागील चार वर्षात गरिबांना सशक्त केले. आंतरराष्ट्रीय संस्थेप्रमाणे मागील दोन वर्षात 5 कोटी लोकं गरिबी रेषेच्या बाहेर पडले आहे.
सशस्त्र बल यात पुरुष अधिकार्‍यांप्रमाणे महिला अधिकार्‍यांना स्थायी कमीशन दिले जाईल. 
देशाला 90 हजार कोटींची बचत करवली.
3 लाख बोगस कंपनींना ताळा घातले
25 सप्टेंबरला पूर्ण देशात पंतप्रधान जन आरोग्य लाँच करण्यात येईल
बलात्कारच्या राक्षसी विकृतीवर प्रहार करण्याची गरज. अनेक राज्यांमध्ये अश्या प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा ठोठावली गेली आहे.
2014 मध्ये स्वच्छतेची थट्टा केली गेली होती, डब्ल्यूएचओ प्रमाणे भारतात आता तीन लाख मुलांचा जीव वाचला आहे.