शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

येत्या १८ ऑगस्टला इम्रान खानचा शपथविधी

येत्या १८ ऑगस्ट रोजी पीटीआयचे प्रमुख इम्रान खान  पाकिस्तान पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते सिनेटर फैजल जावेद यांनी ट्विट करुन याची माहिती दिलेय. दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव, पंजाबचे उपमुख्यमंत्री नवज्योतसिंग सिद्धु आणि सुनील गावस्कर यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण सांगण्यात आलेय.
 
 राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी १३ ऑगस्ट रोजी संसदेचे सत्र बोलावले आहे. या सत्रात नवनिर्वाचित सदस्य शपथ घेतील. पीटीआयच्या संसदीय समितीने सोमवारी इम्रान खान यांना संसदीय दलाचे नेते म्हणून निवडले आणि पंतप्रधानपदासाठी नामांकित केले, अशी माहिती ट्विट करुन  फैजल जावेद यांनी दिलेय.