मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

घरात सोफ्यामागे झोपला होता सिंह, महिलेने दाखवला जंगलाचा रस्ता

ओरेगॉन- अमेरिकेच्या ओरेगॉनमध्ये एक महिला त्यावेळी घाबरली जेव्हा तिने घरातील सोफ्यामागे एक पहाडी सिंह झोपलेला बघितला. सिंह तेथे सहा तास झोपला राहिला.
 
लौरेन टेलर नावाच्या महिलेने फेसबुकवर सांगितले की तिच्या घरी 8 जुलै रोजी ही घटना घडली. महिलेच्या घरामागे असलेल्या एका तलावावर पाणी पिऊन सिंह मागल्या दाराने घरात शिरला. महिलेने पोस्टमध्ये लिहिले आहे की दार उडले होते आणि तेथील इंटिरियल अशा प्रकारे आहे की सिंह घरात शिरतो त्याला हे कळूनच आले नसेल. घरात शिरल्यावर टेलरच्या रूममेटला बघून सिंह घाबरला आणि जोराने किंचाळला. याच कारणामुळे सिंह सोफ्यामागे लपला आणि तिथे त्याला झोप लागली.
 
टेलरने सिंहाला उठवण्यासाठी हल्ला केला, मग त्याच्या डोळ्यात प्रेमाने बघितले आणि त्याला शांत करण्यासाठी संवाद साधला.
 
टेलरने म्हटले हे हैराण करण्यासारखे आहे पण मी प्रेमाने बघितलं तर सिंहाने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आणि तो पुन्हा झोपून गेला. त्याला तेथे सुरक्षित वाटत होतं. सिंह उठल्यावर त्याने पुन्हा संवाद साधला.
 
काही तासाने टेलरने ठरवले की मी घाबरलेली नाही असा व्यवहार करून सिंहाला घरातून काढायचे आहे. मग सिंहाला काढण्यासाठी त्याने एक ड्रमची मदत घेतली.
 
टेलरला जनावरांसोबत काम करण्याचा अनुभव होता आणि याचं फायदा घेत सिंहाला बाहेर काढण्यात यश मिळविले.
चित्र सौजन्य : फेसबुक