रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: इस्लामाबाद , बुधवार, 25 जुलै 2018 (14:38 IST)

पाक ऐतिहासिक निवडणुकीसाठी सज्ज

नवीन पंतप्रधान निवडणसाठी आज (बुधवारी)पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणुका शांततेत आणि निर्भयपणे पार पडाव्यात याकरिता 4 लाख पोलीस आणि 3 लाख 71 हजार 388 लष्करी जवान तैनात करणत आले आहेत. 
 
पाक निवडणूक आयोगाच्या मते नॅशनल असेंब्लीच्या 272 जागांसाठी 3459 उमेदवार निवडणूक रिंगणात असून चार प्रांतिय असेंब्लीच्या 577 जागांसाठी 5393 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. 105.96 दशलक्ष मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 
 
1.6 दशलक्ष निर्वाचन अधिकारी आणि कर्मचारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी याकरिता कार्यरत आहेत. 85 हजार मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. 
 
दरम्यान राजकीय विश्लेषक डॉ. सईद फारुक हसनत यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, देशाच्या इतिहासातच ही निवडणूक अतिशय वेगळ्या प्रकारची ठरणार आहे. परंतु कोणता पक्ष विजयी होऊन सरकार बनवेल हे भाकीत करणे अवघड आहे. परंतु जो कोणता पक्ष सत्तेवर येईल तो पाकला मजबूत सरकार देईल. आर्थिक विकासासाठी मजबूत आणि स्थिर सरकारची पाकला आवश्कता आहे.