बुधवार, 24 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 जुलै 2018 (09:21 IST)

स्कार्फचा फास नऊ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

kid death with skarf
नाशिक येथे दुर्दैवी घटना घडली आहे. झोपलेली चिमुकली पडू नये या काळजीपोटी बांधलेल्या स्कार्फचाच फास लागून नऊ महिन्यांच्या मुलीचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना सातपूरच्या शिवाजीनगरमध्ये  घडली़ आहे. आराध्या योगेश खाडपे (समर्थ रेसीडेन्सी, शिवशक्ती चौक, शिवाजीनगर, सातपूर) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. योगेश खाडपे आपली पत्नी आणि 9 महिन्यांच्या आराध्यासह सातपूर येथे भाड्याच्या खोलीत राहतात. आज दुपारी आराध्याला झोळीमध्ये झोपवून आई मनीषा खडपे या घरातील कामं करत होत्या. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी मनिषा खाडपे यांनी मुलगी आराध्या हिस घरातील झोळीमध्ये झोपण्यासाठी टाकले. मुलगी झोळीतून ती खाली पडू नये या काळजीने त्यांनी झोळीला स्कार्फने बांधला व त्यानंतर घरकामामध्ये व्यस्त झाल्या. मात्र अचानक झोपेत खाली सरकत आलेल्या आरध्याला स्कार्फचा गळफास बसला. त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.