सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 जुलै 2018 (16:50 IST)

राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

‘विठ्ठलालाच तुमचे दर्शन नको असेल’, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आषाढी पूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सदरची टीका केली आहे. ते  सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून सोमवारी त्यांनी परभणीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
 
दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी पूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्र्यांना कोणीही रोखू शकत नाही. पण १० लाख वारकऱ्यांच्या जिवाला धोका होईल असे प्रयत्न केले जात आहेत. यामुळे यंदा आषाढी पूजेसाठी पंढरपूरला जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. सोमवारी सकाळी पंढरपूरमध्ये मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा करण्यात आली.