मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 23 जुलै 2018 (15:08 IST)

बजाज चेतक स्कूटरला पुन्हा मार्केटमध्ये आणणार

साल २००६ पर्यंत बजाजने सर्वांच्या मनावर राज्य केलं. आता पुनरागम करण्यासाठी बजाज तयारी करत आहे. बजाज चेतक स्कूटरला पुन्हा मार्केटमध्ये आणत आहे. बजाज चेतक पुढच्यावर्षी लॉन्च केलं जाऊ शकतं. नव्या बजाज चेतकची किंमत ७० हजार रुपये असू शकते. याचे इलेक्ट्रिक वर्जनदेखील भारतीय बाजारात लॉन्च केले जाऊ शकते. बजाजच्या नव्या मॉडेलमध्ये १२५ सीसी, एअर कूल्ड इंजिन दिलं गेलंय. ही इंजिन ९-१० bhp आणि ९ Nm टॉर्क जनरेट करू शकते. सस्पेंशनसाठी सिंगल आर्म फ्रंट संस्पेशन आण रियर मोनोशॉक दिले जाणार आहे.  
 
१९७२ ते २००६ पर्यंत बजाज चेतकचे उत्पादन केलं जात होतं. गियरलेस स्कूटर बाजारात आल्यानंतर बजाज चेतक अपडेट करण्यात आली नव्हती. याचा परिणाम विक्रीवर झाला आणि २००९ मध्ये कंपनीला गाशा गुंडाळावा लागला. बादशाह कंपनी बजाज ऑटो स्कूटरचे सेग्मेंट करतेय. स्कूटर सेगमेंटमध्ये कधी काळी कंपनीचे ५० टक्केहून अधिक शेअर्स होते. पण सध्या बजाजच्या स्कूटर सेगमेंटमध्ये केवळ १५ टक्के मार्केट शेअर वाचले आहेत. होंडा एक्टिवा, पियाजियो, वेस्पा आणि अप्रीलिया SR150 यांच्याशी बजाजच्या स्कूटरची स्पर्धा आहे.