मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 21 जुलै 2018 (14:42 IST)

भोंदूबाबाकडून १२० महिलांवर बलात्कार

हरियाणा पोलिसांनी ६० वर्षांच्या एका भोंदूबाबाला १२० महिलांवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या बाबाचे नाव महंत बाबा अमरपुरी (खरे नाव अमरवीर) उर्फ बिल्लू असे आहे. प्रत्येक महिलेवर बलात्कार करताना त्याने त्याची व्हिडिओ क्लीप तयार केली. त्यानंतर हा भोंदूबाबा या व्हिडिओंद्वारे महिलांना ब्लॅकमेल करत होता अशीही माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी बाबा अमरपुरीला अटक केले त्यानंतर त्याची रवानगी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
 
या भोंदूबाबावर बलात्कार, विनयभंग यासहीत इतर गुन्हेही नोंदवण्यात आले आहेत. आयटी अॅक्टच्या कलमांनुसारही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझे म्हणणे तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या व्हिडिओ क्लिप मी व्हायरल करेन अशी धमकी हा भोंदू बाबा सगळ्या महिलांना देत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या भोंदूबाबावर ९ महिन्यांपूर्वी बलात्काराचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिलेच्या पतीने यासंबंधीची तक्रार नोंदवली होती. या भोंदूबाबाने मंदिरातच बलात्कार केला असेही तक्रारीत म्हटले होते.