बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 जुलै 2018 (17:34 IST)

१६ टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित

राज्य सरकारने भरतीसाठी घोषित केलेल्या शासकीय सेवेतील ७२ हजार पदांपैकी १६ टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित असतील, अशी महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.विधान परिषदेत गुरुवारी आमदार विनायक मेटे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिले. 
 
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या मेगा नोकर भरतीमध्ये मराठा समाजासाठी १६ टक्के जागा आरक्षित ठेवल्या जाणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय सध्या हायकोर्टाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे निकालानंतरच हा बॅकलॉग भरला जाईल, असे त्यांनी सांगितले.