जगामध्ये महिलांसाठी भारत असुरक्षित देश
भारतात महिला सुरक्षित नसल्याचे मत समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी व्यक्त केले आहे. महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘‘भारत आता जगामध्ये महिलांसाठी असुरक्षित देश बनत आहे. त्यावर सरकारचे काय म्हणणे आहे?, असा संतप्त सवाल जया बच्चन यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. राज्यसभेत आ कठुआ प्रकरणावरुन खडाजंगी चर्चा झाली. या चर्चेत भाग घेताना जया बच्चन यांनी सरकारला महिलांवरील अत्याचाराच्या प्रश्नावरून धारेवर धरले.
'रॉयटर्स'च्या अहवालाचा हवाला देत या आंतरराष्ट्रीय संघटनेने दिलेले अत्याचाराचे आकडे आणि तुमचे आकडे वेगळे कसे?, असा प्रश्नही त्यांनी बाल विकास राज्यमंत्री वीरेंद्र कुमार यांना विचारला.