शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 21 जुलै 2018 (14:24 IST)

५० वर्षापूर्वी विमान अपघातात ठार झालेल्या सैनिकाचा मृतदेह सापडला

हिमाचल प्रदेशच्या लाहौल खोऱ्यात गिर्यारोहकांना ५० वर्षांपूर्वीचे अपघातग्रस्त विमानाचे अवशेष आढळून आले आहेत. वायुसेनेचे एएन-१२ या विमानाचा ५० वर्षपूर्वी अपघात झाला होता. या अपघातग्रस्त विमानाचे भाग तसेच एका सैनिकाचा मृतदेह आढळला आहे. या विमानात १०२ प्रवासी प्रवास करत होते. हे विमान चंदीगडवरून लेह येथे जात होते.
 
गिर्यारोहकांचा एक ग्रुप १ जुलै रोजी चंद्रभागा-१३ या ठिकाणी स्वच्छतेचे अभियान सुरु होते. यावेळी त्यांना विमानाचे अवशेष आढळून आले तर थोड्याच अंतरावर सैनिकाचा मृतदेह आढळून आला. याचे फोटो ऑल्टीटयूड वॉर स्कूलमध्ये पाठविण्यात आले. यानंतर त्यांनी येथे शोधमोहीम सुरु केली असता हे विमान ५० वर्षापूर्वीचे अपघातग्रस्त विमान असल्याचे समजले.