मलेशियाच्या संसदेत भूत, सोशल मिडीयावर जोरदार चर्चा
मलेशियाच्या संसदेतील एक फोटो सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये एक भूत दिसल्याचं अनेकांनी त्यांच्या मेसेजमध्ये लिहलं आहे. फोटोमध्ये साधूसारखी दिसणारी एक व्यक्ती दिसत असून या फोटोवरून जगभरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
या मेसेजची आम्ही जेव्हा पडताळणी केली असता हे साधू महाराज मलेशियातील खासदार पी.वेदमुर्ती यांचे मित्र असून १७ जुलै रोजी वेदमुर्ती यांनी खासदारकीची शपथ घेतली तेव्हा तो सोहळा पाहण्यासाठी त्यांनी या मित्राला खास निमंत्रण पाठवलं होतं. अरुणाचलानंद असं या साधूबाबांचे नाव असून ते ४० वर्ष विश्वशांतीसाठी प्रयत्न करत असल्याचं वेदमुर्ती यांनी म्हटलं आहे. आपल्या मित्राला भूत म्हणून जगभरात हिणवल्याने वेदमुर्ती यांनी नाराजी व्यक्त केली आहे.