शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जुलै 2018 (08:50 IST)

मालेगावात धुळ्याची पुनरावृत्ती, चार जणांना मारहाण

धुळ्यानंतर आता मालेगावमध्येही मुले पळवणाऱ्या टोळीच्या संशयावरून चार जणांना मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत मारहाण झालेले चौघेही परभणी जिल्ह्याचे असल्याची माहिती समोर आली आहे. या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. सदरची घटना रविवारी रात्री घडली आहे. 
 
या घटनेमध्ये मालेगाव येथील आझादनगर परिसरात मुले पळवून नेणारी टोळी आल्याची अफवा पसरली होती. त्या अफवेच्या संशयावरून चार जणांना जमावाने एका खोलीत कोंडून मारहाण केली. त्यावेळी तिथे आलेल्या पोलिसांच्या गाडीचीही जमावाने तोडफोड केली. या घटनेमुळे तेथे काही काळ तणावही निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. अशा कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.