testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

लहान मुलांना पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून मारहाण; पाच जणांचा मृत्यू

jail
धुळे| Last Modified सोमवार, 2 जुलै 2018 (09:00 IST)
साक्री तालुक्यात लहान मुलांना पळवणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याच्या संशयावरून आदिवासींनी सात जणांना मारहाण केली असून यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर मारहाण झालेल्यांपैकी दोघे पळून जाण्यात यशस्वी झालेत. या प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली आहे.राईनपाडा (ता. साक्री) येथील ग्रामस्थांनी या कोंडूनलोकांना खोलीत कोंडून ठेवत मारहाण केल्याचे हे कृत्य केल्याची माहिती मिळत असून दगडांनी चेहरे विद्रुप केल्यामुळे मृतांची ओळख पटलेली नाही. पाचही जणांचे मृतदेह पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत.वृत्त काळातच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम रामकुमार घटनास्थळाकडे दाखल झाले. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे हेदेखील साक्रीकडे रवाना झाले आहेत.
सातारा आणि सांगलीतील सातजण राईनपाड्यात आले होते. बाजार असल्यानं मुलं पळवायला टोळी आल्याची अफवा यावेळी गावात पसरली. यानंतर ग्रामस्थांनी पाचजणांना ठेचून मारलं. भारत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, भारत शंकर मालवे, अप्पा श्रीमंत भोसले आणि राजू भोसले अशी हत्या करण्यात आलेल्या पाचजणांची नावं आहेत. हे सर्व जण भिक्षा मागून जगत होते अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, या धक्कादायक घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून नागरिक दहशतीखाली आहेत. घटनास्थळी पोलीस फौजफाटा दाखल झाला आहे.याचाही औरंगाबाद, नंदुरबार आदी ठिकाणी अशाच संशयावरून मारहाणीच्या घटना घडल्या असून संधी दिसताच लोक हात साफ करून घेतात मात्र यावेळी थेट पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोशल मीडिया वरून अशा अफवांचे पेव फुटले आहे. त्यामुळे उतावीळ नागरिकांनी चौकशी करून पोलिसांना माहिती देणे महत्वाचे आहे.यात पोलीस कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल करतात याकडे लक्ष आहे.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

Batten: बॅटन आजाराच्या फक्त एका रुग्णासाठी त्यांनी बनवलं

Batten: बॅटन आजाराच्या फक्त एका रुग्णासाठी त्यांनी बनवलं औषध
अमेरिकेत राहणारी आठ वर्षांची मिला एका असाध्य आजाराने ग्रस्त आहे. मज्जासंस्थेशी संबंधित या ...

किम जोंग उन: पवित्र डोंगरावर उत्तर कोरियाच्या अध्यक्षांची ...

किम जोंग उन: पवित्र डोंगरावर उत्तर कोरियाच्या अध्यक्षांची घोड्यावरून रपेट
उत्तर कोरियातील सर्वात उंच आणि पवित्र समजल्या जाणाऱ्या पॅकटू पर्वताला नेते किम जोंग उन ...

बेक्झिट : बोरिस जॉन्सन म्हणतात, UK आणि युरोपियन युनियनमध्ये ...

बेक्झिट : बोरिस जॉन्सन म्हणतात, UK आणि युरोपियन युनियनमध्ये अखेर करार झालाय
युनायटेंड किंग्डम आणि युरोपियन युनियन यांच्यात ब्रेक्झिटसंदर्भातला एक करार निश्चित झाला ...

आचारसंहिता भंगाबद्दल राहुल गांधींवर कारवाई करा प्रदेश ...

आचारसंहिता भंगाबद्दल राहुल गांधींवर कारवाई करा प्रदेश भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी
वणी (जि. यवतमाळ ) येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असभ्य ...

दिवाळी आगोदर सहा दिवस राहणार बँका बंद, ही आहेत कारणे

दिवाळी आगोदर सहा दिवस राहणार बँका बंद, ही आहेत कारणे
ऑक्टोबर महिना संपत असून काही दिवस बाकी आहेत. उर्वरीत दिवसांमध्ये देशातील वेगवेगळ्या ...