शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 जून 2018 (09:36 IST)

भयंकर : संपत्तीच्या वादातून भावाचे कुटुंब जाळले

crime in delhi
संपत्तीच्या वादातून सोलापूर जिल्ह्यातील बार्शीजवळच्या खांडवी गावात रामचंद्र देवकते याने त्याच्या भावाचं घर जाळून टाकलं. या आगीमध्ये कस्तुराबाई (रामचंद्रची आई) सुषमा देवकते, राहुल देवकते आणि त्यांचा ३ वर्षांचा मुलगा आर्यन यांचा होरपळून मृत्यू झाला. 
 
राहुल आणि रामचंद्र यांच्यामध्ये घराच्या जागेवरून वाद सुरू होता. या वादामुळे रामचंद्रने भावाला धडा शिकवायचं ठरवलं होतं. त्याने गुरुवारी मध्यरात्री त्याची आई कस्तुराबाई यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतला आणि त्यांना पेटवून दिलं. या आगीने काही क्षणातच संपूर्ण घराला वेढलं. या आगीमुळे छोट्या आर्यनला आणि त्याच्या आईला म्हणजेच सुषमाला घराबाहेर पडताच आलं नाही,ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर राहुल आणि कस्तुराबाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.