बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जून 2018 (09:12 IST)

पश्चिम रेल्वे २ बाय २ च्या छोट्याशा जागेसाठी ११ लाख रुपये भाडे

हो हे खरे आहे. २ बाय २ च्या छोट्याशा जागेसाठी ११ लाख रुपये भाडे मोजण्यात आले आहे. हा सर्व प्रकार पश्चिम रेल्वेच्या लोकलच्या स्थानकांवर घडला असून, २ बाय २ च्या छोट्याशा जागेत बूटपॉलिश करणाऱ्या श्रमिकांनी जागेच्या भाड्यापोटी ११ लाख ६६ हजार, १४२ रुपये पश्चिम रेल्वेच्या खजिन्यात जमा केले आहेत. माजी नगरसेवक राज कुमार पश्चिम रेल्वेकडे चोरघे यांनी माहिती अधिकाराखाली विरार ते चर्चगेट स्टेशन वरील फलाटावर बूट पॉलिश करून  उदर निर्वाह करत असलेल्या कामगारांबाबत पूर्ण माहिती मागवली आहे. या माहिती नुसार पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारीआरती सिंग परिहार यांनी ती पूर्ण माहिती दिली आहे. या उघड माहितीनुसार पश्चिम रेल्वच्या विरार ते चर्चगेट दरम्यानच्या प्रत्येक स्थानकातील प्रत्येक फलाटावर दोन फूट बाय दोन फूट च्या जागेत बसत असलेल्या सर्व २६३ बूट पॉलिशवाल्यांकडून मासिक भाड्या पोटी सन २०१७ ते २०१८ या आर्थिक वर्षात ११ लाख ६६ हजार , १४२ रुपयांचे भाडे प्राप्त झाले आहेत.