रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 17 जानेवारी 2018 (10:54 IST)

अजब: चक्क तिने केले भुताशी लग्न

आयर्लंडमधल्या ४५ वर्षाच्या एका बाईने चक्‍क भुताशी लग्‍न केलं आहे. अर्थात हे ‘भूत’ कुणी पाहिलेले नाही. तिच्या म्हणण्यानुसार त्याचे अस्तित्व आहे.  जॅक नावाच्या माणसाच्या भुताशी आपण अनेक वर्षे प्रेमसंबंधात होतो आणि आता आम्ही लग्‍न केले आहे, असे तिने म्हटले आहे. हा जॅक तीनशे वर्षांपूर्वी मृत्यूमुखी पडला होता. ‘माझा पती एक हैतियन समुद्री डाकू होता’ असे तिने सांगितले. तो ‘पायरेटस् ऑफ कॅरेबियन’च्या कॅप्टन जॅक स्पॅरोसारखा दिसत असावा, असे तिला वाटते.  दोघांच्या लग्‍नापूर्वी त्यांचा साखरपुडाही झाला. त्यावेळी जॅकच्या अस्तित्वाचे प्रतीक म्हणून ठेवलेल्या एका तलवारीवर तिने अंगठी ठेवली. विशेष म्हणजे अमांडाचे यापूर्वी एका  माणसाबरोबर लग्‍न होऊन दोघांना पाच मुलंही झालेली आहेत.  आता  घटस्फोट झालेला आहे.