गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

आम्हीही भयभीत झालो आहोत, असे का म्हटले व्हॉट्सअपने

भारतात होत असलेल्या जबर मारहाण,मृत्यू, अफवा पसरवून होणारा छळ यामुळे  आम्हीही भयभीत झालो आहोत, असे व्हॉट्सअपने केंद्र सरकारला कळवले  आहे.

केंद्र सरकारने फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपला मंगळवारी खोट्या व डोकी भडकविणार्‍या संदेशांना आळा घालण्यासाठी त्वरित पावले उचला अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा  दिला होता.  समाजमाध्यमातून पसरविण्यात येणार्‍या अफवा, खोटी माहिती यांना आळा घालण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कंपन्या, केंद्र सरकार व नागरिकांनी संयुक्तरित्या प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे  गंभीर दखल घेत व्हॉट्सअपने केंद्रीय माहिती तंत्रज्ञान खात्याला पाठविलेल्या उत्तरात म्हटले आहे.

व्हॉट्सअपची रचना लोकांच्या सुरक्षिततेची कंपनीला काळजी असल्याने त्यादृष्टीनेच केली आहे. असे    कंपनीने म्हटले आहे. या अ‍ॅपचा गैरवापर टाळण्यासाठी लोकांनी सजग राहाण्याकरिता काही तांत्रिक सोयीही त्यात उपलब्ध करुन दिल्या आहेत. असे मत  व्हॉट्सअपने केंद्र सरकारला कळवले  आहे.  देशात विविध ठिकाणी झालेल्या जबर मारहाणीत गेल्या काही महिन्यांत २० जण मरण पावले आहेत. तर धुळे साक्री येथे ५ निरपराध लोकांचा बळी   लोकांनी घेतला होता.