शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

युपीत पोलिसांनीच केला बलात्कार, महिलेला अमानुष मारहाण

उत्तर प्रदेशातचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पोलिसांचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा देशाला दिसला आहे. युपीतील  बांदा जिल्ह्यातील कमासीन पोलीस ठाण्यात पोलिसांनी अमानुषपणाचा केला आहे. यात पोलिसांनीच महिलेवर सामूहिक बलात्कार केला व  नंतर गुन्ह्यातून आरोपींची नावं वगळण्यासाठी तिला पट्ट्याने जबर मारहाण केली असे समोर आले आहे.

या भागातील माध्यमांनी दिलेल्या वृत्ता नुसार  २ डिसेंबर २०१७ रोजी पीडितेवर सामूहिक बलात्कार झाला.  पीडितेची तक्रार घेण्यास पोलीस टाळाटाळ केली, या गंभीर प्रकरणी  पोलीस काहीच कारवाई करत नसल्याने पीडितेने न्यायालयात दाद माहितली.  शेवटी न्यायालयाच्या आदेशाने पोलिस कर्मचारी हरिहर नाथ शुक्ला व होमगार्ड राधेश्यामसह इतर चार जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

ज्यावेळी पिडित महिला या खटल्याची कॉपी घेण्यासाठी कमासिन पोलिस ठाण्यात गेली होती, कमासीन पोलिसठाण्याच्या इंचार्ज प्रतिमा सिंह यांनी तीला आरोपींची नावं वगळायला दबाव टाकला. मात्र पिडितेने आरोपी पोलिसांची नावं वगळण्यास नकार दिल्याने पोलिस ठाण्यातच तिला पट्याने मारहाण केली . तिच्या शरिरावरील मारहाणीचे व्रण पोलिसांच्या अमानुषतेचे पुरावे देत आहेत.