शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

झारखंड: एकाच कुटुंबातील सहाजणांची आत्महत्या

बुराडी कांडनंतर झारखंडमधील हजारीबागमध्ये एकाच कुटुंबातील सहाजणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कुटुंब कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचे कळले आहे. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे कारण स्पष्ट करण्यात आले आहे. 
 
मृतांमध्ये महावीर महेश्वरी (७०), त्यांची पत्नी किरण महेश्वरी (६५), मुलगा नरेश (४०), त्याची पत्नी प्रीती (३७), त्यांची मुले अमन (११) आणि यान्वी (६) यांचा समावेश आहे. त्यातील पाचजणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली तर एकाने पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये अमनला फासावर लटकवू शकत नसल्याने त्याची हत्या केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
 
गणिताच्या सूत्रामध्ये सुसाईड नोट लिहिलेले आहे. महावीर यांचे ड्रायफ्रूटचे होलसेलचे दुकान आहे. सध्या ते कर्जबाजारीपणामुळे त्रासले होते.त्यांनी गणिताच्या सूत्राप्रमाणे सुसाईड नोट लिहिली आहे. बिमारी+ दुकान बंद+ दुकानदारों का बकाया न देना+ बदनामी+ कर्ज -> तणाव -> मौत अशा प्रकारे त्यांनी सुसाईड नोट लिहिली आहे.