वारकरी वर्गाला त्रास नको मराठा क्रांती मोर्चा, बंद बुधवारी
मराठा आरक्षणाबाबत साठी सुरु असलेल्या आंदोलनात आज काकासाहेब शिंदे या तरुणाचा बळी गेल्याने सरकारच्या निषेधार्थ बुधवारी मराठा क्रांती मोर्चाकडून बंदची हाक देण्यात येण्याची शक्यता आहे. आजच्या आषाढी एकादशीच्यानिमित्ताने पंढरपुरात असलेले वारकरी उद्या परतीच्या वाटेवर असणार आहेत, त्यामुळे मंगळवार ऐवजी कदाचित बुधवारी महाराष्ट्र बंद असेल असे समन्वय समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या बाबतचे वृत्त दैनिक लोकसत्ता ने दिले आहे. तर काकासाहेव यांच्या मृत्यूने मोठ्या प्रमाणात राजकीय टीका सुरु झाली आहे. औरंगाबद येथे काकासाहेब दत्तात्रय शिंदे (वय 28) या तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन जीव दिला. त्यानंतर संतप्त मराठा आंदोलकांनी रास्ता रोको करत आंदोलन आणखी तीव्र केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्याशिवाय काकासाहेब यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही. अशी भूमिका येथील मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांनी घेतली आहे. त्यामुळे पेच अधिक वाढला आहे. यामुळे संपूर्ण राज्यात अशांतता निर्माण तर होणार नाही ना यावर सरकार विचार करत असून लवकरच निर्णय घेणार आहे.