बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पूर्व-उत्तर क्षितिजावर उल्कावर्षाव दिसणार

येत्या रविवार १२ आॅगस्टच्या रात्री ययाती (पर्सिड्स) तारकासंघातून होणारा उल्कावर्षाव होणार आहे. अर्थात  आकाश निरभ्र असल्यास तासाला साठ ते सत्तर उल्का पडताना दिसू शकतील, असे खगोल अभ्यासकाचे म्हणणे आहे. 

१२ आॅगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर तीन वाजता (सोमवारी १३ आॅगस्ट रोजी पहाटे) ईशान्य म्हणजे पूर्व-उत्तर क्षितिजावर ययाती तारकासंघातून उल्कावर्षाव दिसेल. या दिवशी पृथ्वी ही स्विफ्ट टटल धूमकेतूच्या मार्गातून जाईल. सुमारे १३३ वर्षांनी सूर्याला प्रदक्षिणा घालणारा स्विफ्ट टटल हा धूमकेतू याआधी ११ डिसेंबर १९९२ रोजी सूर्यापाशी आला होता. त्यामुळे ताशी दोनशे ते पाचशे उल्का पडताना दिसल्या होत्या.