1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018 (11:05 IST)

संशयिताला अटक, 8 देशी बॉम्बसह स्फोटकं बनवण्याचं साहित्य जप्त

arrested
दहशतवाद विरोधी पथकानं वैभव राऊत नावाच्या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद आढळल्यानं त्याच्या घरावर छापा टाकला. त्याच्या घरातून आणि जवळच असलेल्या दुकानातून बॉम्ब बनविणण्याचे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. ताे सनातनचा साधक असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, सनातनच्या वकिलांनी हा आरोप फेटाळला आहे. 
 
मुंबईतील नालासोपा-यात ही कारवाई करण्यात आली आहे. दहशतवादीविरोधी पथकाच्या छाप्यात 8 देशी बॉम्बसह स्फोटकं बनवण्याचं साहित्य सापडलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संशयितावर पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाची टीम पाळत ठेवून होती. अखेर त्याच्या घरावर छापा टाकत त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.