गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

दाऊदच्या तारिक परवीनला मुंबईतून अटक

Dawood Ibrahim Aide Tariq Parveen Arrested
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील बांधकाम व्यवसायाची सूत्रे सांभाळणारा तारिक परवीन याला ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मुंबईतून अटक केली. १९९८ मध्ये मुंब्रा येथे केबल वॉरमधून झालेल्या दोघांच्या हत्येप्रकरणी तारिकच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. धक्कादायक बाब म्हणजे मुंबई पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर तारिक ऑफिस थाटून त्याच्या कारवाया करत होता. त्याच्या अटकेमुळे दाऊदच्या आर्थिक साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे.
 
१९९८ मध्ये मुंब्रा येथे तारिक परवीनने मोहम्मद इब्राहिमसोबत केबल व्यवसाय सुरू केला, मात्र धंद्यातील वैमनस्यातून तारिकने त्याच्या हस्तकांकरवी मोहम्मदवर अंदाधुंद गोळीबार केला. यात मोहम्मद आणि परवेज अन्सारी या दोघांचा मृत्यू झाला तर या गोळीबारात एका लहान मुलीच्या मांडीत गोळी घुसली. या घटनेनंतर तारिक पोलीस यंत्रणांना २० वर्षांपासून गुंगारा देत होता, मात्र त्याने मुंबईच्या जी. टी. हॉस्पिटलजकळ असलेल्या अशोका शॉपिंग सेंटरमध्ये काही दिवसांपूर्वी त्याच्या बांधकाम व्यवसायासाठी कार्यालय सुरू केले होते.