शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या

मुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची अज्ञात इसमाने गोळ्या झाडून हत्या केली. मोटारसायकलवरून निघालेल्या सावंत यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर समोरून दोन गोळ्या झाडण्यात आल्या.  सावंत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.  
 
कुरारच्या आप्पापाडा येथे राहणारे सचिन सावंत हे शाखा क्रमांक ३९चे माजी उपशाखाप्रमुख होते. रविवारी  रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या सहकाऱ्यासह मोटारसायकलवरून जात होते. कांदिवलीच्या गोकुळनगर परिसरातील साईबाबा मंदिरासमोर ते आले असता रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दोघा अज्ञात इसमांनी सावंत यांना भाऊ म्हणून आवाज देत थांबण्यास सांगितले. सावंत हे भाऊ म्हणून परिचित होते. त्यामुळे सावंत यांच्या सहकाऱ्याने मोटारसायकल थांबवली. मोटारसायकल थांबताच पाठीमागे बसलेल्या सावंत यांच्यावर अज्ञात इसमाने समोरून दोन गोळ्या झाडल्या आणि तेथून पळ काढला.