मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नाशिक करन्सी नोट प्रेस शाई संपली, नोटा छपाई बंद

संपूर्ण देशाला चलनी नोटा पुरवठा करणाऱ्या नाशिक करन्सी नोट प्रेस मध्ये मोठ दुर्लक्ष झाल्याचा  प्रकार समोर आला असून , देशात एका प्रकारे नोटबंदी सारखा चलनी तुटवडा निर्माण झाला असून , त्यात भर म्हणून नोटा छपाईची शाईच संपली आहे.  त्यामुळे नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये 20, 100, 200 आणि 500 च्या नोटांची छपाई जवळपास बंद आहे. त्यामुळे याचा मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.
 
या प्रकरणात केंद्र सरकारने नवीन डिझाईन असलेल्या   20 आणि 100 च्या नोटांचं मंजूर न केल्याने, त्या  नोटांची पूर्ण छपाई थांबली आहे.  त्यात 200 आणि 500 च्या नोटांच्या छपाईसाठी लागणाऱ्या शाईचा तुटवडा असल्याने नोटांच्या छपाईवर  त्याचा  मोठा परिणाम झाला आहे.
 
त्यातही मार्चपर्यंतच्या स्टॉकची छपाई पूर्ण झालेली आहे. एप्रिलपासूनची केंद्राची नवीन  ऑर्डर न आल्याने पुढील छपाई बंद करण्यात आली आहे. केद्र सरकारच्या गाफील कारभारामुळे नोटांच्या छपाईवर झाला आहे.
 
आपल्या देशात नाशिक (महाराष्ट्र), देवास (मध्य प्रदेश), सालबोनी (पश्चिम बंगाल) आणि म्हैसूर (कर्नाटक) या चार ठिकाणी नोटांची छपाई करण्यात येते. देशातील चलनी नोटांपैकी नाशिकमध्ये दररोज साधारणपणे पाच दशलक्ष नोटा छापल्या जातात या नोटांच्या छपाईसाठी लागणारी शाई ही परदेशातून मागवण्यात  येते.
 
दहा राज्यांमध्ये चलन तुटवडा
बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रातील काही भागात एटीएममध्ये खडखडाट जाणवत आहे. नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या स्थितीसारखे  देशातील  अनेक भागात एटीएम 'कॅशलेस'झाले आहेत.