मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 2 ऑगस्ट 2018 (11:41 IST)

पाकिस्तानातून यांना आली आमंत्रण

पाकिस्तान तहरीके इंसाफ (पीटीआय) पक्षाचे नेते इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनणार आहेत. ११ ऑगस्टला इम्रान खान यांचा शपथविधी होणार आहे. इम्रान खान यांच्या शपथविधीला सुनिल गावसकर, कपिल देव, नवजोतसिंग सिद्धू आणि अभिनेता आमीर खान यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे. फवाद चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या शपथविधीसाठी आमंत्रण दिलं जाऊ शकतं, असे संकेत पीटीआयनं दिले आहेत. 
 
दरम्यान, निवडणुकीमध्ये पीटीआय हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असला तरी त्यांना बहुमत मिळालेलं नाही. पीटीआयनं निवडणुकीत ११६ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पीटीआयला बहुमताला २२ जागा कमी आहेत. पण पीटीआयकडे बहुमत असल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे. मुत्ताहिडा कयामी मुव्हमेंट पाकिस्तान, ग्रॅण्ड डेमोक्रॅटिक अलायन्स आणि बलुचिस्तान अवामी पक्ष, पीएमएलक्यू आणि अपक्षांशी पीटीआयनं बोलणी केली आहेत.