शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

Blue whale challenge नंतर आता Momo Whatsapp वर सुरू सुसाइड गेम

दोन वर्षांपूर्वी ब्लु व्हेल चॅलेंज या खुनी खेळामुळे विश्वभरातील पालक घाबरलेले होते. या खेळामुळे अनेक मुलांनी जीव गमावला होता आणि आता पुन्हा सावध राहण्याची गरज आहे कारण असाच धोकादायक गेम सोशल मीडियावर आपले पाय पसरत आहे.
 
मोमो व्हॉट्सअॅप चॅलेंज एक सुसाइड गेम आहे. व्हाट्सअॅपवर एक नंबर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर एक व्हाट्सअॅप कॉन्टॅक्ट शेअर केला जात आहे ज्याचा एरिया कोड जपान येथील आहे. या नंबरच्या प्रोफाइल फोटोमध्ये दिसत असलेली भीतिदायक चेहरा असलेल्या मुलीचे नाव मोमो आहे. असे म्हटले जात आहे की या नंबरवर चॅट करणारा सुसाइडकडे वळतो.
 
मोमोचा फोटो जपानच्या म्युझियममध्ये ठेवलेल्या एका डॉलच्या आकृतीने प्रेरित आहे. विचित्र चेहरा असल्यामुळे लोकांना हिच्याप्रती आकर्षण निर्माण होत असून लोकं तिच्याशी चॅट करत आहे. लोकांच्या मनात भीती पैदा करणे या खेळाचा उद्देश्य आहे आणि या खेळाचे टार्गेट लहान वयाचे मुलं असू शकतात कारण गेममध्ये मुलांना गुंडाळणे अधिक सोपं असतं.
 
चॅट दरम्यान यूजर आत्महत्येसाठी प्रेरित होतं म्हणून काहीही वाईट घडण्यापूर्वी यूजर्सला सावध राहण्याची गरज आहे. म्हणून आपल्या मुलांना या चॅलेंजबद्दल सावध करा आणि कोणत्याही अनओळखी माणसाशी न बोलण्याची ताकीद द्या. ओळखीचा व्यक्ती असल्यावरच नंबर सेव्ह करा. फोन अँटी व्हायरसने प्रोटेक्ट करा व सोशल मीडयावर मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवा.