Jio phone 2: दुपारी 12 वाजेपासून सुरू होत आहे फ्लॅश सेल, jio.com हून विकत घ्या
Jio Phone 2 ची फ्लॅश सेल आज दुपारी 12 वाजेपासून सुरू होणार आहे. ज्या ग्राहकांना याला विकत घ्यायचे आहे ते या Jio Phone 2 Flash Sale मध्ये भाग घेऊ शकतात. पण हा जिओ फोन 2 फारच सीमित संख्येत उपलब्ध होईल.
कंपनीने यंदा Jio Phone 2 ला QWERTY कीपॅडमध्ये आणले आहे. हा फोन KaiOS वर काम करतो. मागच्या वर्षी कंपनीने Jio Phoneला लाँच केले होते. जिओची आधिकारिक वेबसाइट jio.comचे मानले तर जे ग्राहक जिओ फोन विकत घेईल, त्याला 5-7 दिवसात हा फोन मिळेल. तसेच, ग्राहक याला आपल्या जवळच्या ऑथराइज्ड रिटेल शॉपमधून देखील घेऊ शकतात.
Jio Phone 2 ची भारतात किंमत फक्त 2999 रुपये आहे. कंपनी या फोनवर कुठलेही रीफंड देत नाही आहे. मागच्या जियो फोनवर कंपनीने रीफंडाचा ऑफर दिला होता.
कंपनीनुसार, जिओ फोन फक्त आधिकारिक वेबसाइट jio.com वरच उपलब्ध होईल. जर तुम्हाला हा फोन विकत घ्यायचा असेल तर पानाला सारखे रिफ्रेश करावे लागेल. यानंतर 12 वाजेपासून फोन विकत घेऊ शकता. फ्लॅश सुरू झाल्यानंतर काहीवेळा जास्त ट्रॅफिक असल्यामुळे साईट हँग होऊ शकते.