रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

व्हॉट्सअॅपवर आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येईल

फेक न्यूजवर नियंत्रण ठेवण्यासाठी इंस्टट मेसेजिंग प्लेटफॉर्म व्हॉट्सअॅपने मोठे बदल करत आता मेसेज फॉरवर्ड करण्याची सीमा ठरवली आहे. व्हॉट्सअॅप अपडेटनंतर आता भारतात यूजर्स कोणताही मेसेज 5 हून अधिक वेळा फॉरवर्ड करु शकणार नाही.
 
मेसेज फॉरवर्ड लिमिट भारतातील 20 कोटी लोकांनावर लागू करण्यात आली आहे. अफवांवर नियत्रंण ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यूजर्स आता केवळ पाच मेसेज पाठवू शकतील. मेसेज फॉरवर्ड लिमिट आता दिसू लागली आहे.
 
यापूर्वी फेक मेसेजमुळे टीकांना समोरा जात असलेल्या व्हॉट्सअॅपने देशातील लोकांना जागरुक करण्यासाठी व्हिडिओ सुरु करण्याची माहिती दिली होती. या व्हिडिओद्वारे यूजर्सला फॉरवर्ड मार्क यासह मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी व्हिडिओ तपासण्याची संधी मिळेल. तर आता व्हॉट्सअॅपच्या या पाऊलामुळे सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवा कितपत थांबतील हे बघायचे आहे.