अॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार
अॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी डिस्प्लेसोबत येणाऱ्या इतर फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा असेल असे सांगण्यात येत होते. अॅपल कंपनी ही सुविधा खास आशियायी बाजारपेठेसाठी आणू शकते.
यावर्षी कंपनी नवीन ३ मॉडेल लाँच करणार आहे. यातील एक फोन लो बजेट असेल. iPhone X या फोनला ६.१ इंचाचा एलसीडी डिस्प्ले असेल. याबरोबरच आताच्या फोनप्रमाणेच ५.८ इंचाचा डिस्प्ले असलेले iPhone X चे आणखी एक व्हर्जन दाखल होईल. याशिवाय सर्वात महागडा असलेला iPhone X plus हा ६.५ इंचाच्या ओएलईडी स्क्रीनसोबत येईल. आयफोनच्या या तिन्हीही व्हर्जनला पुढच्या बाजूने फेस आयडीचे फिचर असेल.