रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 19 जुलै 2018 (08:57 IST)

iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांत

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अॅपलचा iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी करण्याची संधी आहे. फ्लिपकार्टवर ग्राहकांना iPhone-6 च्या 32जीबी व्हेरियंटचा फोन ग्राहकांना 3,667 रुपये प्रतिमहिना नो कॉस्ट इएमआयवर खरेदी करण्याचीही ऑफऱ आहे. याशिवाय 731रुपये प्रतिमहिना भरुनही हा फोन खरेदी करता येऊ शकतो. तसंच या फोनवर 15 हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर कंपनीकडून दिली जात आहे. म्हणजे तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात नवा फोन घेतल्यास 15 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. म्हणजे जर कोणाला पूर्ण एक्सचेंज ऑफर मिळाली तर फोनची किंमत कमी होवून केवळ 6 हजार 999 रुपये होईल. याशिवाय एसबीआयच्या कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट आणि अजून 700 रुपये डिस्काउंट मिळेल. अशाप्रकारे हा फोन तुम्हाला केवळ 6 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी करता येणार आहे.