बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जून 2018 (12:19 IST)

या फोनची किंमत आहे 22,999 रुपये, मिळू शकतो फक्त 6,999 रुपयांमध्ये

Motorolaच्या Moto X4 फोनवर Flipkart सेलमध्ये डिस्काउंट मिळत आहे. हे डिस्काउंट फार जास्त आहे. 22,999 रुपये असणारे Moto X4 ची किंमत डिस्काउंट नंतर फक्त 6,999 रुपये होईल. पण ऑफर मागे एक अट आहे.
 
Flipkart आपल्या सेलमध्ये मोटोरोलाच्या या फोनवर 16,000 रुपयांचा बायबॅक गारंटी देत आहे. यानंतर फोनची किंमत फक्त 6,999 रुपये होईल. तसेच या ऑफरच्या माध्यमाने सेलमध्ये इतरही बरेच स्मार्टफोन्स देखील आहे. या स्मार्टफोन्समध्ये Moto G6 Play, Moto Z2 Force आणि Xiaomi Redmi Note 5 सामील आहे.
 
गूगल पिक्सल 2 वर देखील आहे ऑफर
 
इ कॉमर्स सेलमध्ये गूगलचे पिक्सल 2 स्मार्टफोनवर देखील ऑफर आहे. या फोनची किंमत 70 हजार रुपये आहे पण ग्राहकाला हे फक्त 10,999 रुपयांमध्ये मिळत आहे. पण हा फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकाकडे एचडीएफसी कार्ड असणे अनिवार्य आहे. तसेच फोनवर बायबॅक गारंटी ऑफर देखील देण्यात येत आहे.