आता दोन ‘स्मार्ट स्पीकर्स’चे गुगलने भारतात अनावरण केले. त्यापैकी गुगल होमची किंमत ९,९९९ रुपये आणि गुगल होम मिनीची किंमत ४,४९९ रुपये आहे. या स्पीकर्समुळे भविष्यात जीवनशैली अधिक स्मार्ट होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.या स्पीकर्सद्वारे माहिती मिळविता येणार आहे, तसेच घरातील इतर गॅजेट्सवर नियंत्रण करता येणे शक्य असेल. त्यासाठी देण्यात येणाऱ्या अॅण्ड्रॉइड सहायकावरून त्याला आज्ञा देता येणार आहे.
या दोन्ही स्पीकर्सची विक्री ऑनलाइन आणि साडेसातशे दुकानांतून करण्यात येणार आहे. गुगलची स्पर्धा भारतात काही महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या अॅमेझॉनच्या स्पीकर्ससोबत होण्याची शक्यता आहे. फ्लिपकार्टवर गुगल होम आणि गुगल होम मिनीसोबत आकर्षक योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यात राऊटर मोफत भेट देण्यात येत आहे.