Flipkartला विकत घेण्यासाठी या कंपनीने बाजी मारली, लवकरच होईल डील
ऑनलाईन इ-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला विकत घेण्यासाठी बर्याच कंपन्या डावपेच लावत आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार फ्लिपकार्टला विकत घेण्याच्या दौडमध्ये अमेरिकेचा रिटेल ग्रुप वॉलमार्ट सर्वात वर आहे. दुसरीकडे अमेजनने देखील फ्लिपकार्टवर कब्जा कायम ठेवण्यासाठी 60 टक्के शेअर्स विकत घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
डीलमध्ये येऊ शकतात अडचणी
असे मानले जात आहे की फिल्पकार्टचे को-फाउंडर आणि एग्जीक्यूटिव चेयरमॅन सचिन बंसल यांना कंपनीच्या सीईओ पदावरून काढण्यात येऊ शकत. तसेच वॉलमार्टचे म्हणणे आहे की फ्लिपकार्ट डील जगात त्याच्याकडून करण्यात आलेली सर्वात मोठी इ-कॉमर्स डील असेल. या डीलच्या मदतीने वॉलमार्टला भारतातील ऑनलाईन बाजारामध्ये देखील आपला विस्तार करण्यास मदत मिळेल. पण वॉलमार्टला सॉफ्टबँककडून अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे, कारण सॉफ्टबँकची इच्छा आहे की फ्लिपकार्ट आणि अमेजनचा आपसात विलय व्हायला पाहिजे.
फ्लिपकार्टचा प्रवास
सचिन बंसल आणि बिन्नी बंसल दोघांनी मिळून 5 सप्टेंबर 2007 मध्ये फ्लिपकार्टच्या नावाने आपली एक कंपनी उघडली होती. सचिन बंसल आणि बिन्नी बंसल यांनी लोकांच्या विचारांना भारतात बदलले आणि कॅश ऑन डिलीवरी सुरू केली. या अगोदर भारतात ऑनलाईन साईट फक्त डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डहून पैसे घेत होती ज्यावर लोकांना जास्त भरवशा नव्हता.