सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑक्टोबर 2017 (17:45 IST)

आता फ्लिपकार्टचा बिग दिवाली सेल

फ्लिपकार्टने 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान  बिग दिवाली सेलची तारीख जाहीर केली आहे. या सेलमध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि टीव्हीवर भरघोस सूट देण्यात येणार आहे.

टीव्ही आणि अॅप्लायन्सेसवर 70 टक्क्यांपर्यंत सूट आणि एचडीएफसी क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. फोन पेवरुन पेमेंट केल्यास 20 टक्के कॅशबॅक (200 रुपयांपर्यंत) मिळेल. काही स्मार्टफोनवर भरघोस सूट असेल. तर बजाज फिनसर्व्हसोबत मिळून फ्लिपकार्ट 4 लाख फोनवर नो कॉस्ट ईएमआय देणार आहे.

 

मोबाईल फोनवर मोठी सूट देण्यात येणार आहे. यात  वेगवेगळ्या प्रकारांमध्ये टॉप 3 फोनची निवड करण्यात येणार आहे. रेडमी नोट 4, लेनोव्हो K8 प्लस आणि शाओमी रेडमी नोट 4 हे फोन ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादानुसार टॉप 3 फोनमध्ये असतील. स्वस्त फोनमध्ये मोटो सी प्लस, मोटो ई 4 प्लस आणि सॅमसंग गॅलक्सी J7-6 हे फोन आहेत. तर टॉप 3 प्रीमिअम स्मार्टफोनमध्ये आयफोन 6, आयफोन 7 आणि सॅमसंग गॅलक्सी एस 7 या फोनचा समावेश आहे.