मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

फ्लिपकार्टवर ‘अॅपल डेज सेल’ चे आयोजन

फ्लिपकार्टवर 24 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान ‘अॅपल डेज सेल’चं आयोजन करण्यात आलं आहे. या सेलमध्ये अॅपलच्या आयफोनसह इतर वस्तूंवर मोठी सूट दिली जात आहे. या सेलमध्ये सर्वात मोठी सूट आयफोन 7 वर आहे. 80 हजार रुपये किंमतीचा आयफोन 7 चा 256 GB स्टोरेज असलेला फोन 20 हजार रुपयांच्या सूटसह 59 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
 
 
20 हजार रुपयांची सूट आणि सोबतच 19 हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफरही आहे. आयफोन 7 च्या 32GB स्टोरेज व्हेरिएंटवर 12 हजार रुपयांची सूट असून हा फोन 47 हजार 999 रुपयात उपलब्ध आहे.‘अॅपल डेज सेल’मध्ये आयफोन 7 प्लसच्या 32GB स्टोरेज व्हेरिएंटवर 11 हजार 600 रुपयांची सूट आहे. हा फोन 61 हजार 399 रुपयात खरेदी केला जाऊ शकतो. तर जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात 19 हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफरचाही लाभ घेता येईल. आयफोन 7 प्लस 128GB स्टोरेज व्हेरिएंटवर 11 हजार रुपयांची सूट असून हा फोन 70 हजार 899 रुपयात खरेदी करता येईल. आयफोन SE चा 16GB स्टोरेज असलेला फोन 6 हजार रुपयांच्या सूटसह 20 हजार 999 रुपयात उपलब्ध आहे. तर आयफोन 6 चा 16GB स्टोरेज असलेला फोन 25 हजार 990 रुपयात खरेदी केला जाऊ शकतो.