1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Young Man Inserts one Liter Bottle into Private Part in Agra

तरुणाने गुप्तांगात घातली एक लिटरची बाटली; असह्य वेदनांमुळे धावला रुग्णालय, डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक कारण

तरुणाने गुप्तांगात घातली एक लिटरची बाटली; असह्य वेदनांमुळे धावला रुग्णालय
उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. येथे एका ३८ वर्षीय व्यक्तीच्या मलाशयात एक लिटरची प्लास्टिकची पाण्याची बाटली अडकली होती. यामुळे त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी सुमारे एक तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर ही बाटली बाहेर काढली.
 
३६ तास सहन केल्या वेदना
मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील साकेत कॉलनीतील हा तरुण सुमारे ३६ तास या वेदना सहन करत होता. जेव्हा त्रास खूपच वाढला, तेव्हा त्याने रुग्णालय गाठले. तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे काढला, ज्यामध्ये त्याच्या मलाशयात एक लिटरची प्लास्टिक बाटली अडकल्याचे स्पष्ट झाले. ही बाब समजताच त्याला तातडीने आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले.
 
अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया
रुग्णालयाचे वरिष्ठ सर्जन डॉ. सुनील शर्मा यांच्या मते, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील होते. बाटली बाहेर काढताना रुग्णाच्या आतड्यांना किंवा मलाशयाला गंभीर इजा होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे होते. डॉक्टरांच्या पथकाने सुमारे १ तास १० मिनिटे मेहनत घेऊन यशस्वीरित्या ही बाटली शरीराबाहेर काढली.
 
डॉक्टरांनी सांगितले त्यामागचे कारण 
डॉक्टरांच्या मते, हा रुग्ण एका विशिष्ट 'मनो-लैंगिक विकाराने' ग्रस्त आहे. याला वैद्यकीय भाषेत 'एनल इरोटिसिज्म' असे म्हटले जाते. या विकारात व्यक्तीला असामान्य वस्तूंशी लैंगिक उत्तेजना मिळते आणि त्या नादात लोक आपल्या शरीराच्या अवयवांसोबत असे धोकादायक प्रयोग करतात.

डॉ. सुनील शर्मा यांच्या टीमने वेळेवर शस्त्रक्रिया करून या तरुणाचे प्राण वाचवले आहेत. आता त्याला संसर्ग टाळण्यासाठी औषधे आणि मानसिक उपचारांसाठी सल्ला देण्यात आला आहे.
पुढील लेख
शाळेत टॉवेल गुंडाळून नाचणाऱ्या मुलींचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट