बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जुलै 2017 (14:18 IST)

वॉलमार्ट इंडियाची 900 कोटीची गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासनाच्या उद्योग विभाग आणि वॉलमार्ट इंडिया यांच्यात  सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार वॉलमार्ट इंडिया येत्या काळात राज्यात 15 अतिरिक्त मॉडर्न होलसेल कॅश ऍण्ड कॅरी स्टोअर्स सुरु करणार आहे. यासाठी 900 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यामुळे 30 हजार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या सांमजस्य कराराच्या वेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, वॉलमार्ट इंडियाचे अध्यक्ष क्रिश अय्यर आदी उपस्थित होते.