रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated :नवी दिल्ली , गुरूवार, 10 मे 2018 (12:47 IST)

जगातील सर्वात मोठी इ-कॉमर्स डीलमुळे तुम्हाला फायदा होईल की नुकसान, जाणून घ्या

देशातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला जगातील टॉप रिटेल चेन अमेरिकेचे वॉलमार्टने विकत घेतले आहे. इ कॉमर्सच्या जगात हा सर्वात मोठा फायदा आहे. वॉलमार्टने 16 अरब डॉलर (1.07 लाख कोटी रुपये)मध्ये फ्लिपकार्टचे 77 टक्के भागीदारी विकत घेतली आहे. माहितीनुसार  ऍमेझॉन देखील फ्लिपकार्टला विकत घेण्यासाठी उत्सुक होती पण बाजी वॉलमार्टच्या हाती लागली. IIT दिल्लीहून पास आऊट दोन मित्र बिन्नी बंसल आणि सचिन बंसल यांनी फ्लिपकार्टची सुरुवात केली होती.
 
बर्‍याच वेळेपासून भारतात आपले पाय जमवण्यासाठी इच्छुक वॉलमार्टसाठी ही डील फारच महत्त्वाची मानण्यात येत आहे. या डीलचा भारताच्या ई कॉमर्स बाजारावर देखील प्रभाव पडेल. प्राइस वॉरमुळे जेथे ग्राहकांना चांगले ऑफर्स मिळण्याची उमेद आहे तसेच फ्लिपकार्टवर उपस्थित ऑनलाईन सेलर्सची काळजी वाढत आहे की वॉलमार्ट त्यांचा खात्मा करू शकते.
 
ऑनलाईन सेलर्सची चिंता
जगातील या सर्वात मोठी ई कॉमर्स डीलमुळे सर्वात जास्त चिंतित फ्लिपकार्टवर उपस्थित ऑनलाईन सेलर्स आहे. या सेलर्सला भिती आहे की वॉलमार्ट त्यांचा खात्मा करून देईल. वॉलमार्ट आपल्या प्लेयर्सला फ्लिपकार्टच्या माध्यमाने मार्केटमध्ये आणून लो प्राइस वार सुरू करू शकते.  वॉलमार्टचा इतिहास देखील काही असाच आहे. कमी किमतीत सामान विकून वॉलमार्ट लहान व्यापारिंचा खात्मा करून देते. त्यासाठी ते दुसर्‍या देशांपासून स्वस्त सामान आणून भारतात आणू शकतो. ऑल इंडिया ऑनलाईन वेंडर्स असोसिएशनचे म्हणणे आहे की जर यामुळे जास्त नुकसान झाले तर ते कायदेशीर मार्ग देखील काढावा लागेल.
ऍमेझॉनला मागे टाकण्यासाठी काही पण करेल 
वॉलमार्टचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी ऍमेझॉनला मानले जात आहे. भारतात ऍमेझॉनचे इ-कॉमर्स फार मोठे नाव आहे. अशात ऍमेझॉनला मागे टाकण्यासाठी वॉलमार्ट पुरेपूर जोर लावेल. फ्लिपकार्टच्या आधी वॉलमार्ट जेट डॉट कॉम, शूबाई आणि बोनोबॉसचे अधिग्रहण करून चुकली आहे.
 
चीनमध्ये ऍमेझॉनशी टक्कर घेण्याच्या प्रयत्न करत असलेली वॉलमार्टला भारतात एक मजबूत जोडीदार मिळाला आहे. या गुंतवणुकीत सर्वात जास्त नुकसान लहान व्यापार्‍यांना होणार आहे आणि ग्राहकांना फायदा होईल. वॉलमार्टने या आधी देखील भारतात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे पण एफडीआयच्या कडक कायद्यामुळे तो फक्त 'कॅश अँड कॅरी'च्या थोक व्यापारापर्यंतच मर्यादित होता.
 
रोजगार वाढतील, इकॉनॉमीला बूस्ट मिळेल 
वॉलमार्टच्या गुंतवणुकीनंतर आता फ्लिपकार्ट ऍमेझॉनशी जास्त मजबुतीने टक्कर घेईल. आपल्या सप्लायी चेन सिस्टम आणि इन्फ्रास्ट्रक्चरला सुधारण्यासाठी फ्लिपकार्ट आता आधीपेक्षा जास्त गुंतवणूक करेल. यामुळे देशात रोजगाराची संधी वाढेल. या डीलमुळे कृषी आधारित अर्थव्यवस्थेला देखील तेजी मिळण्याची उमेद आहे ज्याचा सरळ फायदा शेतकर्‍यांना होईल.
 
कमी किंमत, जास्त ऑप्शन
वॉलमार्टच्या आल्याने भारतातील इ कॉमर्स इंडस्ट्रीत फार मोठ्या बाउन्सची उमेद आहे. जेथे एकीकडे वॉलमार्ट आपले साम्राज्य पसरवण्याच्या प्रयत्न करेल तसेच दुसरीकडे इतर ईकॉमर्स कंपन्यादेखील आपले गुंतवणूक वाढवतील. अशा परिस्थितीत किंमती कमी आणि वॅरायटीत बाउन्स येईल आणि ग्राहकांसाठी जास्त ऑप्शन खुलतील.