मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

अमेझॉनच्या सेलच्या निमित्ताने नोकर भरती

येत्या 20-24 जानेवारी 2018 मध्ये Amazon.in चा ग्रेट इंडियन सेल सुरू होत आहे. या सेलदरम्यान पॅकिंग, डिस्ट्रिब्युशनवर येणारा ताण पाहता अमेझॉनने तात्पुरते स्वरूपाचे काही जॉब खुले करण्यात आले आहेत. याकरिता 5500  जागांसाठी भरती होणार आहे.  ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून अमेझॉन सेलआधीच सोय करणार आहे. कंपनीच्या कस्टमर केअरमध्येही 1000 सहाय्यकांना काम दिले जाणार आहे. यामुळे ग्राहकांच्या तक्रारी आणि मागण्या वेळीच पूर्ण केल्या जातील.
 
भारतातील प्रमुख मेट्रो सिटींप्रमाणेच हैदराबाद आणि बॅंगलोरमध्ये भरती होणार आहे. अमेझॉनने नोव्हेंबर महिन्यामध्ये ब्लॅक फ्रायडे सेलने धूमाकुळ घातला होता. या महासेलनंतर कंपनीचा संस्थापक आणि सीईओ जेफ बेजोसच्या संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. ब्लॅक फ्रायडे सेलमुळे 6.5 लाख कोटी रूपयांचे ते मालक झाले होते.